*कोकण Express*
*वैभववाडी तालुका शिवसंपर्क अभियानाला कोळपे पं.स. मतदारसंघातुन शुभारंभ*
*पक्ष निरीक्षक शशिकांत करशिंकर यांनी मार्गदर्शन करून गावनिहाय पदाधिकारी निवडीबाबत घेतला आढावा*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार वैभववाडी तालुक्यातील कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोळपे पं.स.व भुईबावडा पं.स. तसेच उंबर्डे पं. स. गणामध्ये हे शिवसंपर्क अभियान संपन्न झाले. या उपक्रमामध्ये या तिन्ही पंचायत समिती मतदारसंघातील शिवसैनिक, पदाधिकारी यामध्ये गावनिहाय शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख, युवासेना अधिकारी, बुथप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला बुथप्रमुख, महिला गटप्रमुख यांनी आपल्या समस्या या तालुक्याचे शिवसंपर्क अभियानाचे पक्ष निरीक्षक शशिकांत करशिंकर व संजय पांडे यांच्या समोर मांडल्या. यावेळी निरीक्षक करशिंकर यांनी मार्गदर्शन करून गावनिहाय पदाधिकारी निवडीबाबत आढावा घेतला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, निरीक्षक संजय पांडे, उपतालुका प्रमुख सुरेश पांचाळ, कोळपे विभागाचे विभागप्रमुख जितेंद्र तळेकर, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, माजी सभापती रमेश तावडे, युवासेना तालुकाप्रमुख अतुल सरवटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा नेर्ले गावचे सरपंच डॉ. आर. बी. जाधव, कोळपे प. स. विभागप्रमुख विशाल राणे, उंबर्डे उपविभाग प्रमुख गौस पाटणकर, उपतालुका संघटक बाबा मोरे, कोकिसरे विभागप्रमुख विठोजी पाटील, कार्यकारणी सदस्य जनार्दन विचारे, नेर्ले उपसरपंच मोहन हडशी, कोळपे शाखाप्रमुख समीर लांजेकर, कोळपे माजी सरपंच मोतीराम माने, तिथवली शाखा प्रमुख नाना जैतापकर, वेंगसर शाखाप्रमुख नंदू खेडेकर, कोळपे विभाग संघटक तथा वेंगसर ग्रामपंचायत सदस्य विलास पावसकर, कुसुर शाखाप्रमुख सुभाष पाटील, कुंभवडे शाखाप्रमुख दीपक चव्हाण, कुंभवडे सोसायटी चेअरमन बाबूराव चव्हाण, उंबर्डे बुथप्रमुख मयूर दळवी, तिरवडे तर्फे खारेपाटण शाखाप्रमुख प्रथमेश तळेकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.