ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक अबिद नाईक यांनी केले स्वागत

*कोकण Express*

*आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक अबिद नाईक यांनी केले स्वागत*

*सिंधुदुर्ग*

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आंबोली येथे आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले. यावेळी सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये घरबांधणीची परवागनी पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींकडे देण्याच्या अनुषंगाने निवेदन देत चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायतींना अधिकार देण्याचे निश्चित झाले असून कॅबिनेटच्या मंजूरीनंतर याबाबतचे आदेश निर्गमित होतील, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री श्री मुश्रीफ यांनी यावेळी दिल्याचे अबिद नाईक यांनी सांगितले.
आंबोली येथे ग्रामविकास मंत्र्यांच्या करण्यात आलेल्या स्वागतावेळी राष्ट्रवादीचे विलास गावकर, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, संदीप राणे, पुडलिक दळवी, सुभाष सावंत, रझाक बटवाले, दिलीप वर्णे, अमित केतकर, विशाल पेडणेकर, अशोक पवार, उदय भोसले, व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य शासनाने नोव्हेंबर 2015 मध्ये घरबांधणीच्या परवागनीच्या निकषात बदल केले. या बदलांचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना बसला आहे. नोव्हेंबर 2015 नंतर या दोन जिल्ह्यांमध्ये घरबांधणीसाठी परवानगी घेताना महसुल यंत्रणेकडे सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांमुळे सर्वसामान्य माणूस अडचणीत आला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्हय़ात गावठाण क्षेत्र घोषीत नसल्याने या दोन जिल्हय़ात हि समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2015 नंतर बाधण्यात आलेली शेकडो घरे आजहि अनधिकृतच आहेत. यावर पर्याय म्हणून सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यात घरबांधणीसाठी ची परवानगी पुर्वी प्रमाणे ग्रामपंचायतींकडे देण्यात यावी. तसेच 2015 पासून बाधकाम झालेल्या घरांनाही नियमित करावे, अशा मागणीचे निवेदन अबिद नाईक यांनी श्री मुश्रीफ यांना सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेवेळी ग्रामपंचायतींना परवागनी देण्याबाबतचे निश्चित झाले आहे. कॅबिनेटच्या मंजूरीनंतर हि कार्यवाहि होईल, असे श्री मुश्रीफ यांनी सांगितल्याचे श्री नाईक यांनी सांगितले सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!