*कोकण Express*
*जिल्ह्यातील गाड्यांकडून टोल वसुली झाल्यास टोलनाके उध्वस्त करू…*
*खासदार विनायक राऊत यांचा इशारा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील गाड्यांकडून टोलवसुली करण्यात आल्यास टोलनाका उध्वस्त करून टाकू असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिला आहे.
जिल्ह्यातील लोकांना टोल मधून वगळण्यात यावे अशी आपली मागणी असून, केंद्र सरकार मधील काही बडे अधिकारी आणि कंत्राटदार संगनमताने रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या पूर्वीच टोल वसुलीचा घाट घालत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला असून, याबाबत आपण मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.