रिफायनरीला संसदेत कडाडून विरोध करणारे खासदार महोदय टोलवसुली विरोधी भुमीका देखील तेवढ्याच प्रखरपणे मांडणार का?

रिफायनरीला संसदेत कडाडून विरोध करणारे खासदार महोदय टोलवसुली विरोधी भुमीका देखील तेवढ्याच प्रखरपणे मांडणार का?

*कोकण Express*

*रिफायनरीला संसदेत कडाडून विरोध करणारे खासदार महोदय टोलवसुली विरोधी भुमीका देखील तेवढ्याच प्रखरपणे मांडणार का?*

*नियोजित ओसरगाव येथील टोलवसुली संदर्भात सेनेच्या खासदारांनी भूमिका स्पष्ट करण्याची गरज…!*

*भाजप शिवसनेच्या नेत्यांनी टोल वसुलीला नुसता मीडियातून विरोध दर्शवण्यापेक्षा आपल्या नेत्यांकडे हायवेबाबत खरी वस्तुस्थिती मांडुन जाब विचारावा..!*

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दि. 25 मे 2022 रोजीच्या नोटिफिकेशन नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली ओसरगाव येथे टोल वसुली करण्याचे आदेश सूचित केले आहेत.यामध्ये 3 महिन्यांसाठी एमडी करीमुनीसा या कंपनीला टोलवसुली करण्यास मंजुरी देण्यात आलेली असून तद्नंतर इतर कंपनीकडे सोपविले जाणार असल्याचे समजते. वास्तविक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हायवेची काम अपूर्णावस्थेत असून प्रकल्पग्रस्तांना देखील प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे.कुडाळ तालुक्यात पणदूर,वेताळ बांबर्डे, पावशी,बिबवणे आदि गावांमधील हायवे व सर्व्हिस रोडची कामे अर्थवट असून देखील टोल वसुलीचा घाट नेमका कुणासाठी घातला जातोय. खासदार विनायक राऊतांनी हायवे टोलवसुलीसाठी कुटुंबियांची कंपनी रजिस्टर करत कंत्राट मिळवण्याचा खटाटोप केला होता अशा बातम्या मीडियातून समोर आल्या होत्या, हा घाट त्यासाठीच घातला जातोय का असा सवाल उपस्थित होत आहे.प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडून, कामे अपूर्ण असताना टोलवसुली आड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसाठी मालिद्याचे दुकान उघडले जात आहे अशी जनभावना आहे.त्यामुळे केंद्रातील भाजप व राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी मीडियातून विरोध दर्शवून गल्लीत गोंधळ करत दिल्लीत मुजरा करण्यापेक्षा आपापल्या वरिष्ठ नेत्यांना टोलवसुलीसाठी घाई गडबड नेमकी का व कुणासाठी केली जातेय याचा जाब विचारण्याची गरज आहे.मनसे पक्ष म्हणून जनतेची बाजू लावून धरेलच मात्र जिल्ह्यातील जनतेने देखील पक्ष मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने वसुलीस विरोध करावा असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!