ओसरगाव येथील टोलनाका कार्यालयाला भाजपा कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे

ओसरगाव येथील टोलनाका कार्यालयाला भाजपा कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे

*कोकण Express*

*ओसरगाव येथील टोलनाका कार्यालयाला भाजपा कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुबंई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे टोलवसुलीच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. टोल वसुली करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यासोबत टोल वसुली कंपनीच्या सुरू केलेल्या कार्यालयाखालील जागा ही स्थानिक ग्रामस्थांची असताना त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईच्या नोटिसा जमीनमालकांना येत आहे. या घटनेचा निषेध करत जोपर्यंत महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण होत नाहीत,जमीन मालकांचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत टोल सुरू करायचा नाही असा इशारा देत भाजपा कार्यकर्ते व जमीन मालक यांनी टोल कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकले.

या निमित्ताने टोल नाक्यावर आज पुन्हा शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण होते. यावेळी एम.डी. करीमुनसा हैदराबाद या ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक अमोल तळसकर, सचिन पडवळ, धवल कुलकर्णी, महामार्ग प्राधिकरणचे शाखा अभियंता एम. आर. साळुंखे, यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी सभापती मनोज रावराणे, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, अवधूत तळगावकर,कळसुली उपसरपंच सचिन पारधीये, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, संतोष चव्हाण, पप्पू पुजारे, समीर प्रभुगावकर, सदा चव्हाण, पप्पू पुजारे, राजन चिके, स्वप्नील चिदरकर, विजय चिदरकर, भाई मोरोजकर, गजानन तळेकर, पार्वती सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!