*कोकण Express*
*ओसार गावातील रहिवाशांना टोल मधून सूट मिळण्यासाठी विशिष्ट ओळखपत्र द्यावे…*
*अन्यथा टोल कंपनीला हुसकावून देऊ…*
*ओसर गावचे रहिवाशी गणेश कदम यांनी इशारा दिला!!*
कणकवली तालुक्यातील ओसरगावला सहा किलोमीटर लांबीचा हायवे लाभला आहे. ओसर गावातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन कामकाजा साठी कणकवली, ओरस कुडाळ येथे नेहमी येजा करावी लागते. सरकारी काम काजासाठी, डॉक्टर जवळ जाण्यासाठी, बाजार करण्यासाठी, शाळा कॉलेज मध्ये जाण्यासाठी , शेतकऱ्यांना शेत माल विकण्यासाठी, खते , शेतीची औजारे आणण्यासाठी नेहमीच गावाबाहेर जावे लागते. अशा वेळी जर विशिष्ट ओळखपत्र गावातील रहिवाशांना दिले तर गावातील रहिवाशांना सोयीचे होईल. अशी रास्त मागणी ओसर गावचे रहिवाशी गणेश कदम यांनी केली आहे. सरकारने व टोल कंपनीने याचा गंभीरपणे विचार करावा नाही तर संघर्ष करावा लागला तरी चालेल शेवटी एवढ लक्षात ठेवावे ही टोल ओसर गावात आहे, आम्ही सौजन्य पुर्वक मागणी करीत आहोत आम्हाला कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये.