*कोकण Express*
*परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर EDची धाड*
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं आहे. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दापोलीतही ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, अनिल परबांच्या पुण्यातील मालमत्तांवरही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब हे वांद्रे येथील घरी नसल्याची माहिती मिळत आहे.
ED चे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते. वांद्रे येथील अनिल परब यांच्या घरी ED च्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडसत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिकेपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.