*खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत उद्या कुडाळ येथे शिवसंपर्क अभियान भव्य मेळावा*

*खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत उद्या कुडाळ येथे शिवसंपर्क अभियान भव्य मेळावा*

*कोकण Express*

*खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत उद्या कुडाळ येथे शिवसंपर्क अभियान भव्य मेळावा*

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुख, खासदार अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचा मेळावा उद्या शुक्रवार दि. २७ मे २०२२ रोजी कुडाळ शहरातील सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
यावेळी शिवसेना सचिव,खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी राज्यमंत्री आ.दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट हे उपस्थित राहणार आहेत.
तरी कुडाळ येथील मेळाव्याला शिवसेना ,युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!