*कोकण Express*
*तारकर्ली पर्यटक बोट दुर्घटनेची चौकशी व्हावी*
*वैभववाडी प्रतिनिधी*
कोरोना महामारीच्या संकटानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होत असताना दि.२४ मे रोजी मालवण तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात पर्यटकांना घेऊन येणारी स्कुबा ड्रायव्हिंगची बोट उलटून दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सिंधुदुर्गच्या पर्यटनाला काळीमा लावणारी आहे. त्या दुर्दैवी घटनेचा ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्था निषेध करीत आहे.
सदर बोटीला स्कुबा ड्रायव्हिंगचा परवाना आहे का ? बोटीत २० पर्यटकांना बसण्याची व्यवस्था होती का ? बोट सुस्थितीत होती का ? बोटीचा चालक कोणत्या स्थितीत होता असे अनेक प्रश्न निर्माण होतात. सदर दुर्दैवी दुर्घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर योग्य कारवाई करावी. अशी मागणी माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश नारकर, उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण व सचिव प्रा. श्री.एस. एन. पाटील यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग त्यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.