सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन पुकारेल,—-अमित सामंत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन पुकारेल,—-अमित सामंत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन पुकारेल,—-अमित सामंत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग*

*प्रथम स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या समस्याना न्याय द्या, नंतर टोल वसुली करा,टोल वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रखर विरोध राहील*

मुंबई कोकण गोवा नॅशनल हायवे क्रमांक ६६ वर ओरोस येथील टोलनाक्यावर दि,२७ मे २०२२ पासून टू व्हीलर थ्रीव्हीलर वाहने वगळता अन्य वाहनांची टोल वसुली सुरू करण्यात येत असल्याचे टोल वसुली कम्पनीने सुतोवाच केले आहे,असे समजते,
परंतु मुंबई कोकण गोवा नॅशनल हायवे क्रमांक ६६ वर अद्याप अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत,स्थानिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,वारंवार जनतेच्या माध्यमातून प्रखर आंदोलन करून न्याय मागण्याचा प्रयत्न होत आहे,जनतेच्या या मागण्यांकडे नॅशनल हायवे ॲथॉरीटी दुर्लक्ष करत आहे,मात्र या सर्व समस्यांची सोडवणूक करण्याचे सोडून टोल एजन्सीच्या माध्यमातून टोल वसुली करण्याचा घाट घातला जात आहे,हे निंदनीय असून,केंद्र सरकारच्या पुढाकाराने टोल एजन्सीच्या माध्यमातून टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेला सोबत घेऊन ओरोस टोल नाक्यावर जन आंदोलन उभारेल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!