दिवीजा वृद्धाश्रमात जिवनावश्यक साहित्य वाटून प्रसाद जाधव यानी आपला वाढदिवस साजरा केला

दिवीजा वृद्धाश्रमात जिवनावश्यक साहित्य वाटून प्रसाद जाधव यानी आपला वाढदिवस साजरा केला

*कोकण Express*

*दिवीजा वृद्धाश्रमात जिवनावश्यक साहित्य वाटून प्रसाद जाधव यानी आपला वाढदिवस साजरा केला.*

*कासार्डे : संजय भोसले*

कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रमोद जठार मित्रमंडळाचे अध्यक्ष, भाजपा कासार्डे जि.प.गटप्रमुख श्री प्रसाद जाधव याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने जीवनावश्यक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी दिविजा वृध्दाश्रमाच्या वतीने औक्षण करून आजी आजोबांबरोबर आश्रमच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा चिटणीस रविंद्र शेटये,भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रहास उर्फ बबलू सावंत, संदिप बांदिवडेकर, बाबू घाडीगांवकर,विलास पाताडे, सहदेव म्हस्के, रोहित महाडीक,अविनाश राघव ,दिविजा वृध्दाश्रमातील व्यवस्थापक संदेश शेटये,दिपिका राबांडेसह आजी आजोबांबरोबर,कर्मचारी उपस्थित होते.

नेहमी सामाजिक बांधिलकीतून कासार्डे परिसरात सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांना नेहमी सहकार्य करणा-या प्रसाद जाधव याचा वाढदिवस कासार्डे येथिल प्रमोद जठार याच्या कार्यालयातही साजरा करण्यात आला यावेळो भाजपा पदाधिकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. आजचा वाढदिवस दिविजा वृध्दाश्रमातील आजी आजोबांबरोबर साजरा केल्याने वेगळा अनुभव आपल्याला आला असून सदैव सामाजिक उपक्रमातून काम करणार असल्याचे प्रसाद जाधव यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!