*कोकण Express*
*वागदे सरपंच पूजा घाडीगावकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेतही मंजूर…!*
*अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थ १७७ मते…!*
*तर सरपंचांच्या बाजूने ४७ मते पडली…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वागदे ग्रामपंचायत सरपंच पूजा घाडीगावकर यांनी शिवसेना पक्ष सोडत भाजपात नुकताच प्रवेश केला होता.त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ८ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला होता.त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभा आयोजित करुन अविश्वास ठरावाबाबत मतदान घेण्यात आले.ठरावाच्या समर्थनार्थ १७७ मते,तर सरपंचांच्या बाजूने ४७ मते पडली.४३ मते अवैध झाली आहे.या सभेचे पीठासन अधिकारी तथा गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी काम पाहिले.
वागदे ग्रामपंचायत मध्ये या अविश्वास ठरावाच्या संदर्भात बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच पूजा घाडीगावकर यांच्या विरोधातील ठरावावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नागरिकांचे मतदान घेण्यात आले.या प्रक्रियेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत गुप्त मतदानाद्वारे हो प्रक्रिया चिठ्ठीद्वारे घेण्यात आली.
हा अविश्वास ठराव मतदानासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बऱ्याच नागरिकांनी वेळ होत असल्यामुळे मतदान प्रकियेत भाग घेतला नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडली. तत्कालीन सरपंच पूजा घाडीगावकर यांना मोठा धक्का बसला आहे.