*कोकण Express*
*नागरिकांनी कामे न झाल्यास मनसे स्टाइल आंदोलन…*
*मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री*
कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांची पिळवणूक सुरू आहे. नागरिकांची कामे महिनोनमहिने होत नाहीत. मोजणीला विलंब केला जातो. तर कमीजास्त पत्रकांची प्रकरणे गहाळ केली जातात. विविध कामांसाठी सातत्याने पैशांची मागणी केली जात असल्याचा मुद्दा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी मांडला. त्यांच्यासह मनसेचे मनसे शहर अध्यक्ष शरद सावंत, निखिल आचरेकर, भुषण ठाकूर, संतोष सावंत, आदींनी आज भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक श्री.भिसे यांना घेराओ घातला होता.
कणकवलीत महामार्ग चौपदरीकरण भूसंपादन प्रक्रियेतील कमी जास्त पत्रक का होत नाहीत. कणकवली प्रांताधिकार्यांनी लेखी पत्र देवून सुद्धा दुर्लक्ष का करता. या कामांत तुम्हाला पैसे हवेत का? न्यायालयाने आदेश देऊन देखील मोजणीची कामे का रखडवली जातात. नागरिकांना नकाशा नक्कल देण्यासाठी पैसे का घेतले जातात? आकारफोड करताना पक्षकारांना रखडवून का ठेवले जाते ? यासह अनेक प्रश्नांचा भडीमार मनसे पदाधिकार्यांनी भूमिअभिलेख उपअधीक्षकावर केला. तर उपअधीक्षक श्री.भिसे यांनी महिन्याभरात सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करू अशी ग्वाही दिली. तर येत्या ५ जानेवारीपूर्वी नागरिकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर कार्यालयात येऊन मनसे स्टाइल आंदोलन करू असा इशारा दया मेस्त्री यांनी दिला.
