तारकर्लीच्या समुद्रात स्कुबा डायविंगची बोट उलटली

तारकर्लीच्या समुद्रात स्कुबा डायविंगची बोट उलटली

*कोकण Express*

*तारकर्लीच्या समुद्रात स्कुबा डायविंगची बोट उलटली*

*दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू*

*७ जण उपचारार्थ दाखल,  उपचारानंतर ११ जण घरी*

*मालवण ः प्रतिनिधी*

देश विदेशात पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्धीस आलेल्या तारकर्ली च्या समुद्रात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्कुबा डायविंग ची बोट समुद्रात पलटी झाली या बोटीतील सर्व पर्यटक समुद्राच्या पाण्यात कोसळले. सुदैवाने बुडणाऱ्या या पर्यटकांना समुद्र किनारी आणण्यास आले असले तरी आठ जणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे आहे. यात उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.या प्रकारामुळे मालवणसह जिल्ह्याची किनारपट्टी हादरून गेली आहे.

सदर बोटीत 20 पर्यटक होते. पैकी 2 पर्यटक मृत झाल्याची माहिती ग्रामीण रूग्णालय मालवण यांचेकडून प्राप्त झालेली आहे. उर्वरीत 18 पर्यटक तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत. सद्यःस्थितीत बोटितील सर्व पर्यटक सापडले असून बेपत्ता पर्यटकांची संख्या शून्य आहे. अशी माहिती पोलीस पाटील देवबाग यांचेकडून मिळालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!