मोंड नगरीतील सत्कार सोहळा गाबीत समाजाला भूषणावह..….माजी आ. परशुराम उपरकर

मोंड नगरीतील सत्कार सोहळा गाबीत समाजाला भूषणावह..….माजी आ. परशुराम उपरकर

*कोकण Express*

*मोंड नगरीतील सत्कार सोहळा गाबीत समाजाला भूषणावह..….माजी आ. परशुराम उपरकर*

देवगड ः*

श्री मांडक़री बाल संगीत मेळा मोंडतर यांनी आयोजित केलेला ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तांचा सत्कार सोहळा समस्त गाबीत समाजाला प्रेरणा देणारा असून तो भूषणावह असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार मा.श्री.परशुराम उपरकर यांनी आपले विचार प्रकट करताना केले.
यावेळी व्यासपीठावर गाबीत समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. सुजय धूरत, गाबीत समाजाचे जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर, अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे माजी अध्यक्ष ऍड. काशीनाथ तारी तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.जनार्दन चौगुले, गावचे पाटील श्री.रामदास चौगुले विराजमान झाले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ.परशुराम उपरकर म्हणाले की,मोंडतर गावातील श्री मांडक़री बाल संगीत मेळा संस्थेने गाबीत समाजातील सेवानिवृत्तांचा व जेष्ठ बांधवांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करून गाबीत समाज बांधवांच्या एकजुटीची प्रचिती दिली आहे.अशी एकवाक्यता आणि एकजूट गाबीत समाजाची वस्ती असलेल्या प्रत्येक वाड़ीत व गावात होणे आवश्यक आहे. असे सांगून आयोजकांचे कौतुक केले. गाबीत बांधवानी आपापसातील वादविवाद सामोपचाराने मिटविले पाहिजेत ते कोर्ट कचेरी पर्यत जाऊ देवू नयेत.असे आवाहन केले.
श्री मांडकरी संस्थेचे अध्यक्ष श्री जनार्दन चौगुले यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले कि, बाल संगीत मेळा ही या गावची सुमारे 60 वर्षापूर्वी पासूनची परंपरा आहे ती आजवर आम्ही जपत आलो आहोत. जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी गाबीत समाजातील संघटनात्मक कामगिरीबाबत माहिती देऊन संघटनेच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.श्री. सुजय धूरत,ऍड. काशीनाथ तारी ,उद्योजक श्री. श्यामसुंदर चौगुले यांनीही आपले विचार व्यक्त केले. सदरील कार्यक्रमात सुमारे 50 सेवानिवृत्तांचा उभयतांचा व जेष्ठ बांधवांचा व शाल, श्रीफळ व नारळ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. बहुसंख्य सत्कारमूर्ति हे नेव्ह ल डॉक,पोर्ट ट्रस्ट,एअर इंडिया, वगैरे मोठ्या कंपन्यातुन 35 ते 40 वर्षे सेवा करून निवृत्त झालेले आहेत. शिवाय नवी पीढ़ी सुद्धा डॉक्टर,इंजिनियर वगैरे शिक्षण घेऊन प्रगतीपथावर आहेत हे गाबीत समाजाचे वैशिष्ट्य आहे. यानिमित्ताने संस्थेचे सचिव श्री. मनोहर चौगुले, प्रदीप भाबल,महेंद्र चौगुले,न्यानदेव बांदकर, दिपतेश चौगुले,शुभम चौगुले, गणेश जोशी ,अनाजी चौगुले वगैरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किशोर गावडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!