*कोकण Express*
*कुडाळ मालवण तालुक्यात उद्यापासून शिवसंपर्क अभियानाचा झंझावात*
*खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत २७ मे रोजी कुडाळ येथे भव्य मेळावा*
*पंचायत समिती मतदारसंघनिहाय एकूण २८ ठिकाणी बैठकांचे आयोजन*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ते २८ मे या कालावधीत राबविले जाणार अभियान*
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ते २८ मे २०२२ या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुख, खासदार अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचा मेळावा २७ मे २०२२ रोजी कुडाळ शहरातील सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
त्याचबरोबर शिवसंपर्क अभियानांतर्गत २५ ते २८ मे २०२२ या कालावधीत कुडाळ तालुक्यात १५ , मालवण तालुक्यात १२ पंचायत समिती मतदारसंघ व मालवण शहर अशा एकूण २८ ठिकाणी बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी, नवीन शिवसेना पदाधिकारी नेमणूक, ठाकरे सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली जाणार असून शिवसेना संघटनेचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच शिवसेना संघटना वाढीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. कुडाळ तालुका शिवसंपर्क अभियानात संजय सावंत,श्रीकांत परब, संतोष चासकर तर मालवण तालुका शिवसंपर्क अभियानात कुस्तुभ कुलकर्णी, संतोष भगत, संतोष खिराडकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी शिवसेना सचिव,खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी राज्यमंत्री आ.दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावराणे,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सुशांत नाईक, कुडाळ संपर्क प्रमुख बाळा म्हाडगुत,माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब, माजी जी. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, जयभारत पालव, अतुल बंगे, महेश कांदळगावकर, मंदार केणी, महिला आघाडीच्या मथुरा राऊळ,स्नेहा दळवी,श्रेया परब,पूनम चव्हाण,श्वेता सावंत,सेजल परब, दीपा शिंदे, योगेश धुरी, मंदार गावडे हे उपस्थित राहणार आहेत.
तरी कुडाळ येथील मेळाव्याला शिवसेना ,युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
*कुडाळ मालवण तालुक्यातील बैठकांची वेळ पुढीलप्रमाणे..*
**कुडाळ तालुका*
२५ मे २०२२ रोजी कसाल जि.प.मतदारसंघ
१) रान बांबुळी सायं ४ वा.
२)कसाल सायं ६ वा.
२५ मे २०२२ रोजी तेंडोली जि.प.मतदारसंघ
१) पाट सायं ५ वा.
२) माड्याचीवाडी सायं ७ वा.
२६ मे २०२२ रोजी नेरूर जि.प.मतदारसंघ
१) चेंदवण सायं ४ वा.
२)सरंबळ सायं ६ वा.
२६ मे २०२२ रोजी पावशी जि.प.मतदारसंघ
१) पावशी सायं ५ वा.
२६ मे २०२२ रोजी वेताळ बांबर्डे जि.प.मतदारसंघ
१) वेताळ बांबर्डे सायं. ७ वा.
२६ मे २०२२ रोजी पिंगुळी जि.प.मतदारसंघ
१) तुळसुली सायं ५ वा.
२) पिंगुळी सायं ६ वा.
२८ मे २०२२रोजी आंब्रड जि.प.मतदारसंघ
१)घोटगे सायं ४ वा.
२)आंब्रड सायं. ७ वा.
२८ मे २०२२रोजी माणगाव जि.प.मतदारसंघ
१) माणगाव सायं ६ वा.
२८ मे २०२२रोजी घावनळे जि.प.मतदारसंघ
१) हळदीचे नेरूर सायं ४ वा.
२) घावनळे सायं ६ वा.
*मालवण तालुका*
२५ मे २०२२ रोजी आचरा जि. प. मतदारसंघ
१)वायंगणी सायं ४ वा.
२)त्रिंबक सायं ७ वा.
२५ मे २०२२ रोजी आडवली मालडी जि. प. मतदारसंघ.
१)ओवळीये सायं ४ वा.
२) रामगड सायं ६. वा.
२६ मे २०२२ रोजी पेंडूर जि. प. मतदार संघ
१) काळसे सायं ४ वा
२)वराड सायं ६ वा
२६ मे २०२२ रोजी पोईप जि. प. मतदार संघ
१) चाफेखोल सायं ४ वा.
२) तिरवडे सायं ६ वा.
२७ मे २०२२ रोजी मालवण शहर सायं ५ वा.
२८ मे २०२२ रोजी देवबाग जि. प. मतदार संघ
१) चौके सायं ४ वा,
२) देवबाग सायं ६.वा.
२८ मे २०२२ रोजी मसुरे जि. प. मतदार संघ
१) वेरली सायं ४ वा
२) हडी सायं ६ वा