*कोकण Express*
*कळसुली हायस्कूलच्या सन १९९०-९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्यात दिला जूण्या स्मुर्तींना उजाळा*
*कासार्डे:संजय भोसले*
कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली या प्रशालेत सन १९९०/९१ च्या एस.एस.सी.बॅचचा स्नेहमेळावा श्री आर.बी.दळवी माजी जि.प. अध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षते खाली व श्री एस.बी. तावडे माजी मुख्याध्यापक एन. व्ही. कुलकर्णी विद्यालय पांग्रड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला
यावेळी कळसुली शिक्षण संघ मुंबईचे अध्यक्ष श्री.श्रीधर वि. दळवी उपकार्याध्यक्ष श्री सूर्यकांत रा. दळवी शालेय समिती चेअरमन श्री के. आर. दळवी सदस्य श्री नामदेव रा. घाडीगावकर श्री अतुल दळवी,माजी शिक्षक श्री.ए.के. मुलाणी, श्री भोसले सर, श्री. जे.के. पाटील, श्री. पी. जी. कदम, श्री. डी. जी. तेली, श्री. श्यामसुंदर राणे, श्री. एस. एस. दळवी, माजी शिक्षकेतर कर्मचारी श्री. एम. के. कदम तसेच प्रशालेत सध्या कार्यरत असलेले शिक्षक श्री. एस. के. सावळ श्री. सी.जी. चव्हाण, श्री. ए. पी. पवार, श्री. ए. जी. सावंत,सौ. एम. एम. दळवी, श्री. एस.ए. परुळेकर, श्री. सी. एम. राणे, शिक्षकेतर कर्मचारी श्री. पी. एस. नाईक त्याचबरोबर सुमारे ४१ माजी विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सकाळ सत्रात सर्व मान्यवरांचा व माजी शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यरत शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर चव्हाण यांनी केले सन १९९०/९१ बॅचचे प्रतिनिधी प्रशांत सावंत, संगीता गुरव, राजन मोर्ये, नंदा चव्हाण, प्रमोद घाडीगावकर यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला व स्नेहमेळावा च्या आयोजनासाठी शुभांगी भालेकर, रणजीत सुतार, किशोर राऊत,किशोर गावकर, दिगंबर गोळवणकर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच प्रशालेला रुपये २५०००/- निधी भेट दिला.याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या.
मान्यवरांनी व प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणात सर्व माजी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी व प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
तर माजी जि.प.अध्यक्ष आर.बी.दळवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळेच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याचे आवाहन करून त्यांच्या भावी जीवनास शुभेच्छा व्यक्त केल्या.
माजी विद्यार्थी चंद्रमणी तांबे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले तसेच दुपारच्या सत्रात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याचप्रमाणे संध्याकाळच्या सत्रात महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशाप्रकारे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.