*कोकण Express*
*आ. वैभव नाईक यांना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही*
*कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक स्वतः पोट ठेकेदाराच्या भूमिकेत*
*आम.वैभव नाईक हे शिवसेनेचे व्यावसायीक लाभार्थी – संतोष कानडे*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
आमदार वैभव नाईक यांना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नसून वैभव नाईक हे शिवसेनेचे व्यावसायीक लाभार्थी आहेत. कुडाळ मालवण मतदारसंघात वैभव नाईक स्वतः पोट ठेकेदाराच्या भूमिकेत असतात. आपल्या क्रशरवरील खडी, स्टील, सीमेंट जबरदस्तीने विक्री करणे हा
एकमेव उद्देश त्या मागे आहे. शिवसेनेचे प्रामाणिक कार्यकर्ते उपाशी ठेऊन वैभव नाईक यांची पोटठेकेदारी जोरात सुरू असल्याची टीका भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी केली आहे. आमदार वैभव नाईक यांनी मतदारसंघात गेल्या दोन आमदारकीच्या कालावधीत सत्ता असून पण एकही लाक्षणिक काम केले नाही. फक्त स्वतःच्या नफ्यासाठी ताडपत्री विकणे आणि दुसऱ्याला टोमणे मारणे ही पंचवार्षिक योजना घेऊन त्यांनी काम केले. अपघाताने आणि मोदी लाटेत भाजपाची मते घेऊन विजय संपादन केला. राणेंवर कार्यकर्त्यांचा विश्वास राहिला नाही, असे सांगणाऱ्या वैभव नाईक यांचे चुलत बंधू आज एका घरात राहून भारतीय जनता पार्टीचे काम करतात यावरून त्यांची विश्वासार्हता समजते. नाईक यांच्या पत्रकार परिषदेतला एकही निष्ठावान शिवसेना पदाधिकारी उपस्थित नसून दोन फिरता रंगमंच कार्यकर्ते डावे उजवे दिसले यावरूनच शिवसैनिकांचा आमदारांवरील रोष समजतो, असेही श्री. कानडे यांनी म्हटले आहे.