*कोकण Express*
*सांगवे ग्रामपंचायत मार्फत मोफत भात बियाणे व खत वाटप*
*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ( गोट्या) सावंत. यांच्या हस्ते वाटप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत मार्फत मोफत भात बियाणे व खत वाटप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ( गोट्या) सावंत. यांच्या हस्ते करण्यात आले .या वेळी उपसरपंच प्रदीप सावंत, सांगवे सोसायटी चेअरमन प्रभाकर सावंत, व्हाईस चेअरमन चंद्ररतन कांबळे,माजी सरपंच महेंद्र सावंत, शीवडाव सोसायटी चेअरमन किरण गांवकर ,सर्व सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी ठाकूर, नितीन गावकर,व शेतकरीउपस्थित .संदेश सावंत यांनी सांगितले की सांगवे गावातील ३०० शेतकऱ्यांना श्री१०१भात बियाणे,२०किलो युरिया खत घर पोच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.खताचे वाटप १५जुन ला करण्यात येणार आहे.या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या स्व निधी फंडातून १०घरांच्या साठी प्रत्येकी २०हजार रुपये मंजूर करण्यात आले.या पैकी प्राथमिक स्वरूपात दोन जणांना वीस हजार रुपयांचा धनादेश संदेश सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी परीसरातील शेतकरी उपस्थित होते.