तुळशिनगर येथील अनधिकृत गतिरोधक देवगड मनसे आक्रमक

तुळशिनगर येथील अनधिकृत गतिरोधक देवगड मनसे आक्रमक

*कोकण Express*

*तुळशिनगर येथील अनधिकृत गतिरोधक देवगड मनसे आक्रमक*

*अधिकाऱ्यांना विचारला जाब*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीमधील तुळशिनगर परिसरातील गतिरोधक तात्काळ काढण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुमारे दीड महिन्यापूर्वी करण्यात आली होती .यासंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने देवगड तालुका मनसेचे पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी यांनी नगर पंचायत प्रशासनाला धारेवर धरले या परिसरातील गतिरोधक हे अनधिकृत असून या गतीरोधकांमुळे वाहन चालक याना त्रास होतो .

दुचाकीस्वार यांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे सूचना फलक व आवश्यक त्या खुणा देखील या मार्गावर करण्यात आलेल्या नाहीत. तुळशीनगर ते वेळवाडी टापु या मार्गावर एक किमी अंतरावर ५ गतिरोधक असून वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने यावर कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. या वर ठोस कार्यवाही न करण्यात आल्याने सोमवारी सकाळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष दया मेत्री तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री मनसे सहसंपर्कप्रमुख संतोष मयेकर, यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत प्रशासनाला जाब विचारण्यात आला.

यावेळी प्रशासकीय कर निर्धारण अधिकारी उमेश स्वामी यांच्याशी चर्चा करत असताना या संदर्भात लेखी निवेदन सादर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने जोपर्यंत कार्यवाहीबाबत लेखी पत्र देत नाही तोपर्यंत नगरपंचायत कार्यालयातून जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी संबंधित नगरपंचायत अभियंता यांचेकडून आवश्यक तो अहवाल प्राप्त करून त्यावर योग्य ती कार्यवाही येत्या काही दिवसात केली जाईल असे आश्वासन प्रशासकीय अधिकारी उमेश स्वामी यांनी दिले.

या शिष्ठमंडळात वरीष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत मनसे तालुका उपाध्यक्ष महेश नलावडे राजा मोंडकर, शहराध्यक्ष सचिन राणे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राकेश मिराशी, शहर उपाध्यक्ष गणेश सागवेकर, मनसे विद्यार्थी सेना पदाधिकारी श्रीकांत सावंत अमोल मिराशी उपस्थित होते. या चर्चेत प्रामुख्याने देवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीत नागरिकांना होत असलेला अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा त्याचप्रमाणे जामसंडे स्मशानभूमीत पाणी टंचाई याबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावर योग्य ती कार्यवाही करण्यात आल्याचे प्रशासकीय अधिकारी उमेश स्वामी यांनी सांगितले. या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री नवपुते व श्री गायकवाड यांची भेट घेऊन दाभोळे येथील रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाबाबत वस्तुस्थितीदर्शक माहिती विशद केली सदर रस्त्याचे काम हे योग्य पद्धतीने करण्यात यावे अन्यथा मनसेच्या स्टाईलने जाब विचारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!