*कोकण Express*
*महामार्गावर साळिस्ते येथे अपघात…*
*अपघातात दोन ठार…*
मुंबई-गोवा महामार्गावर साळिस्ते येथे भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकाला आदळली. यात कारमधील दोघे ठार झाले आहेत.
मुंबईवरून गोव्याच्या दिशेने टॉयटो कार जात होती. या अपघातात अन्य तिघे जण गंभीर आहेत.
हा अपघात कणकवली तालुक्यात साळिस्ते या ठिकाणी सायंकाळी ६ च्या सुमारास झाला गंभीर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेले असून अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे कणकवली पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, कॉन्स्टेबल रुपेश गुरव व महामार्ग वाहतूक पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.