*कोकण Express*
*कणकवली -घोटगे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात ; श्री.वामन तर्फे*
कणकवली -घोटगे रस्त्यावर कळसुली हर्डी दरम्यान सुमारे दोन किलोमीटर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक झाला आहे. दुचाकीस्वारांबरोबर चारचाकी वाहनधारकांना याचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असुन रस्त्यावर मोठ -मोठे रस्ते खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनधारकांची होणारे हाल थांबवावे. या प्रचंड खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित विभागाने याची पाहणी करून उचित कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. वामन तर्फे यांनी केली आहे.