शिवसेना पुरस्कृत ,श्री.लिंगरवळनाथ शेतकरी विकास पॅनेलने १२ पैकी ९ जागा जिंकत भाजपाचा उडवला धुव्वा

शिवसेना पुरस्कृत ,श्री.लिंगरवळनाथ शेतकरी विकास पॅनेलने १२ पैकी ९ जागा जिंकत भाजपाचा उडवला धुव्वा

*कोकण Express*

*शिरवल सोसायटीवर‌ शिवसेनेचा झेंडा…!*

*शिवसेना पुरस्कृत ,श्री.लिंगरवळनाथ शेतकरी विकास पॅनेलने १२ पैकी ९ जागा जिंकत भाजपाचा उडवला धुव्वा*

*चेअरमनपदी रविकांत सावंत तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद कोदे यांची निवड*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील शिरवल‌ येथील शिरवल विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी लिमिटेड शिरवल सोसायटी वर शिवसेना पुरस्कृत .श्री.लिंगरवळनाथ शेतकरी विकास पॅनेलने वर्चस्व प्राप्त केले असून १२ पैकी ९ जागा जिंकत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर भाजपला केवळ ३ जागेवर समाधान मानावे लागले आहे.शिवसेनाप्रणित पॅनेलने भाजप पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडविला आहे.

शिरवल विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी लि. शिरवल सोसायटी च्या चेअरमनपदी शिवसेना पुरस्कृत श्री.लिंगरवळनाथ शेतकरी विकास पॅनेलचे रविकांत ‌यशवंत सावंत यांची तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद दत्ताराम कोदे यांची निवड झाली आहे.

निवडीकरीता अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिरवल सोसायटी कार्यालय येथे संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नूतन संचालक रविकांत यशवंत सावंत, दयानंद दत्ताराम कोदे, सुमित्रा राघो‌‌,कुडतरकर , सुवासिनी लक्ष्मण यादव,रविकांत पांगो‌ तांबे, भिकाजी काशिराम सावंत, विष्णू धोंडु ताम्हाणेकर, बाळकृष्ण महादेव वंजारे. महेश जनार्दन शिरवलकर,हरी भिकाजी सोहनी , यशवंत रघुनाथ सावंत उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या चेअरमनपदासाठी शिवसेनेचे रविकांत सावंत आणि भाजपचे यशवंत रघुनाथ सावंत यांच्यात लढत झाली.यावेळी रविकांत सावंत यांना ‌८ मते तर यशवंत सावंत यांना ‌३‌ मते मिळाली.आणि रविकांत ‌सावंत विजयी झाले.१ संचालक अनुपस्थित होते. रविकांत यशवंत सावंत यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी दयानंद दत्ताराम कोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदीनी सावंत यांनी काम पाहिले.

नवनिर्वाचित चेअरमन रविकांत सावंत यांचे शिवसेना युवानेते सुशांत दळवी,तर व्हाइस चेअरमन दयानंद कोदे यांचे‌ सुनील हरमलकर यांनी ‌पुष्पहार घालून अभिनंदन केले.

यावेळी आबा सावंत, महेश सावंत ,प्रमोद सावंत, प्रमोद नानचे,प्रशांत कुडतरकर,अजित सावंत,प्रविण तांबे,मनोज राणे,बाळा सावंत,व संस्था सचिव प्रज्ञा मेस्त्री यांनी शुभेच्छा दिल्या.

फोटो- शिरवल सोसायटीच्या चेअरमनपदी रविकांत सावंत यांची तर व्हाईसचेअरमन पदी ‌दयानंद कोदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करताना शिवसेना युवानेते सुशांत दळवी आणि सुनील हरमलकर. यावेळी उपस्थित नवनिर्वाचित संचालक आणि शिवसेना पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!