तरुणांनो उद्योग निर्माण करून प्रगती करण्याचा संकल्प करा

तरुणांनो उद्योग निर्माण करून प्रगती करण्याचा संकल्प करा

*कोकण Express*

*तरुणांनो उद्योग निर्माण करून प्रगती करण्याचा संकल्प करा*

*केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आवाहन*

*सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२ चे कणकवलीत उद्घाटन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

चांगले जीवन जगायचे असेल आणि सुखवस्तू मिळवायच्या असतील तर उद्योग-व्यवसाय करा.स्वतःचे उद्योग निर्माण करून प्रगती करण्याचा संकल्प करा.नोकरीच्या मागे लागू नका तरुण- तरुणींना उद्योजक म्हणून उभे करण्यासाठी माझ्या एम.एस.एम.ई खात्याच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.फक्त आत्मविश्वासाने पुढे या. कामात चिकाटी ठेवा, जिद्दीने उभे राहा मी तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेन असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला.
कणकवली येथे एम.एस.एम.ई.आयोजित सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२ चे शानदार उदघाटन भारत सरकारच्या सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
श्री नारायण राणे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझा तरुण उद्योजक व्हावा ही माझी इच्छा आहे. उद्योग क्षेत्रात प्रगती अथांग आहे.त्याचा फायदा घ्या.आसाम मधून येणारे उद्योजक गवता पासून सेंट आणि विविध अत्तर बनवित आहेत तर केरळ मधील लोक नारळाच्या कीशी पासून वस्तू बनतात त्याच प्रमाणे त्या कीशी पासून प्लायवूड सुद्धा बनवतात आणि परदेशात पाठवतात. देशातील सर्वात मोठे उद्योजक धीरूभाई अंबानी हे १५०० रुपयांचे भांडवल घेऊन उदयोग सुरू केला आणि मृत्यु समयी हीच धीरूभाई ची रिलायन्स कंपनी ६३ हजर कोटींची उलाढाल करत होती.त्यांचा आदर्श घ्या.
यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७२ अधिकारी आणले.२०० कोटीचे आधुनिक टेक्नॉलॉजी असलेले उद्योग प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा साठी मी मंजूर केले आहे असेही त्यांनी सांगितले.
नोकरी हवी मग ती शिपाई पदाची असली तरी चालेल ही मानसिकता सोडा.डाळ,पिटी भात खाऊन समाधान मानू नका.देशात करोडो रुपयांची उलाढाल होते त्यात उद्योग क्षेत्रात तुम्ही कधीतरी असणार आहेत की नाही ? असा सवाल यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी युवकांना केला.कोकणी, मराठी माणसाने आत्मविश्वास बाळगावा, १५ ते २० करोड रुपयांचा आपला उद्योग असावा अशी जिद्द बाळगावी.आपल्या येथे गरे, आंबा,कोकम आहेत त्यावर काय प्रक्रिया करून शकता हे ठरवा. छत्रपती शिवाजीराजे यांच्या विचारातून तयार झालेला माणूस हवा.त्यांचा वारसा सांगता तर नवीन निर्मिती करण्याची क्षमता ठेवा.
मी राजकारणात आलो तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा मागासलेला होता.मात्र त्याचा दरडोई उत्पादन वाढविला.आज रस्ते,पाणी,वीज अशा व्यवस्था केल्या. इंजिनिअरिंग कॉलेजे,मेडिकल कॉलेज उभे केले अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या विरोधकांनी काय केले ते सांगावे असा सवालही त्यांनी केला. मी केंद्राचा मंत्री आहे. मी कधी जात,धर्म,आणि पक्ष पाहिला नाही.प्रत्येकाला मदत केली आणि करत राहणार.असेही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!