*कोकण Express*
*सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२ चे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले शानदार उदघाटन*
*३०७ नव्या उद्योजकांना १७ करोड रुपयांचे बँके धनादेशाचे केले वाटप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२ चे शानदार उदघाटन भारत सरकारच्या सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.हे प्रदर्शन २१ ते २३ मे या कालावधीत कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोर चालणार आहे.या सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी
एम.एस.एम.ई.चे डायरेक्टर पी.एम.पार्लेवार,
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,सावंतवाडी सहकारी उद्यमनगरचे चेअरमन श्रीकृष्ण काणेकर,चेंबर्स ऑफ कॉमर्स चे चेअरमन कमलकांत सावंत, मुकुल मेश्राम,डॉ.मिलिंद कुलकर्णी,असिस्टंट डायरेक्टर व्ही.आर.शिरसाट,राहुल मिश्रा, डी.आर. जोहरी आदी उपस्थित होते.
या वेळी प्रस्थाविक करतांना एमएसएमई चे डायरेक्टर पी.एम.पार्लेवार म्हणले की आजच्या या कार्यक्रमात २५० नव्या उद्योजकांना निधी वाटप केला जाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हात नवे उद्योग उभे राहत आहेत हे त्याचे उदाहरण आहे.आजचे हे आयोजन नक्कीच यशस्वी झालेले आहे असा कार्यक्रम प्रथमच घेतला जात आहे आणि तो यशस्वी झाला याचा आनंद आहे.असे श्री पार्लेवार यांनी सांगितले.
सावंतवाडी सहकारी उद्यमनगरचे चेअरमन श्रीकृष्ण काणेकर म्हणले, नारायण राणे केंद्रात मंत्री झाले हे आमचे भाग्य आहे.त्याच्या मुळे आता सहकारी उद्यम साठी खास योजना राबविली जात आहे.एमएसएमईचे अधिकारी स्वतः पाठपुरावा करून येथील उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत.हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुळेच शक्य झाले आहे.
चेंबर्स ऑफ कॉमर्स चे चेअरमन कमलकांत सावंत म्हणाले मी १९५८ मध्ये मी मुंबई सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो मात्र जी ग्रोथ हवी होती ती मिळाली नाही मात्र आता बदल होत आहे.जेव्हा आम्ही उद्योग करायला सुरुवात केली तेव्हा २ लाख बँक लोण मिळत नव्हते जेथे आम्हाला २ कोटी ची अपेक्षा हेती मात्र आता परिस्थिती बदली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुळे बँक लोण आणि सर्व प्रकरणी लायसन्स दारात उपलब्ध झाली आहेत.आता मार्केटिंग चा प्रश्न सुद्धा सुटला आहे.या संधीचा फायदा घ्या.नोकरीच्या मागे धावू नका उद्योजक व्हा असे आवाहन श्री.सावंत यांनी केले.
यावेळी
बँक ऑफ इंडियाचे १५६ लाभार्थ्यांना 6 कोटी 14 लाख,बँक महाराष्ट्र च्या वतीने २ कोटी १२ लाख,तर युनियन बँक च्या वतीने १ कोटी ५३ लाख बँक ऑफ बडोदा कडून १ कोटी ५३ लाख,केनरा बँकच्या वतीने ८५ लाख, स्टेट बँक चे २ कोटी ५० लाख असे एकूण ३०७ नव्या उद्योजकांना १७ करोड रुपयांचे वेगवेगळ्या बँकांचे धनादेश वितरीत करण्यात आले.