सोबत कुणी नसल्यानेच नितेश राणे यांनी डीपीडीसी बैठकीतून पळ काढला ; सतीश सावंत

सोबत कुणी नसल्यानेच नितेश राणे यांनी डीपीडीसी बैठकीतून पळ काढला ; सतीश सावंत

*कोकण Express*

*सोबत कुणी नसल्यानेच नितेश राणे यांनी डीपीडीसी बैठकीतून पळ काढला ; सतीश सावंत*

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपलेला असल्याने जिल्हा नियोजन समितीवर असलेले भाजपचे सदस्य जिल्हा नियोजन समितीच्या सभेत उपस्थित राहू शकत नव्हते. एरव्ही त्याच सदस्यांच्या जीवावर उसने अवसान आणुन सभागृहात बोंबाबोंब करून आमदार नितेश राणे आपण फारच मोठा तीर मारल्याच्या अविर्भावात वावरायचे. मात्र कालच्या सभेत त्यांच्यासोबत खिंड लढवायला कुणी सदस्यच सोबत नसल्याने सभागृहात मुग गिळून गप्प बसण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली असती. त्यामुळेच त्यांनी जिल्हा नियोजन समिती सभेवर बहिष्कार टाकण्याचे निमित्त करून अगोदरच सभेतून पळ काढला, असा खोचक टोला माजी जिल्हा बँक अध्यक्ष, शिवसेना नेते सतीश सावंत यांनी लगावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा काल पार पडली. यात जिल्हा विकासाच्या दृष्टीने अनेक विषय मार्गी लावण्यात आले. याअगोदर झालेल्या सभेत भाजप सदस्यांच्या जीवावर नितेश राणे गोंधळ घालण्याचे काम करत होते. मात्र कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जोडीला असणाऱ्या भाजप सदस्यांना कालच्या सभेत उपस्थित राहता येणार नसल्याने प्रशासकीयद्रुष्टीने अज्ञानी असलेले आ.नितेश राणे हे सभेत एकटे पडले असते. त्यांची शिवसेनेच्या सदस्यांसमोर डाळ शिजली नसती. म्हणूनच त्यांनी शक्कल लढवत सभेवर बहिष्कार टाकला. जर खरोखरच नितेश राणेंना जनतेच्या प्रश्नांची काळजी असती तर त्यांनी सभेतून पळ काढला नसता, अशी टिका सतीश सावंत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!