*कोकण Express*
*विजयदुर्ग किल्ल्यावर महाराष्ट्र दिनी ध्वज फडकविणार*
*सिंधुदुर्गनगरी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायम तिरंगा फडकविण्यात येणारा विजयदुर्ग हा एकमेव ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्यावर शासनाची मान्यता मिळाल्यास १ मे २०२३ या महाराट्र दिनी ध्वज फडकविण्यात येईल. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक गड, किल्ले आहेत. मात्र जिल्ह्यातील एकमेव विजयदुर्ग किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकविला जातो. हे महत्त्व ओळखून या किल्ल्यावर १ मे २०२३ रोजी ध्वजवंदन करण्याचा मानस आहे. त्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे.
शासनाची मान्यता मिळाल्यास १ मे रोजीचा राष्ट्रध्वज ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर फडकविण्यात येईल. चालू आर्थिक वर्षातील पहिलीच नियोजन समिती बैठक आज संपन्न झाली या बैठकीत विविध विकास कामांवर चर्चा झाली तर पुढील सभा एक महिन्यानंतर घेऊन कामांना मंजुरी देऊन नोव्हेंबर पासून जिल्ह्यात विकास कामांना सुरुवात केली जाईल त्यासाठी सर्व यंत्रणांची बैठक घेऊन नियोजन करण्या च्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आला आहे तसेच जिल्ह्यात प्राथमिक शाळा दुरुस्तीचा मोठा प्रश्न आहे त्यासाठी शाळांचा सर्वे करून निर्लेखित करण्यायोग्य शाळा दुरुस्तीस आलेल्या शाळा आणि नवीन वर्गखोल्या बांधण्याची आवश्यक असलेल्या शाळा अशा तीन प्रकारच्या याद्या तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सिंधुरत्न या महत्वाकांक्षी योजनेसाठी आणखी १५० कोटींचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळावा. असा ठराव सभेत घेण्यात आला आहे. अशी माहिती यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन बैठकीत आपल्या मतदार संघातील कामे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली असल्याचे म्हटले, यावर पत्रकार परिषदेत विचारणा केली असता कोरोना कालावधीत काही अधिकाऱ्यांची मानसिकता बिघडली होती. ते अद्यापही कोरोनाच्या नियमावली तून बाहेर पडलेले नाहीत. कोणत्याही वस्तुला हात लावताना त्यांच्या मनात कोरोनाचा भय राहिला आहे. मात्र याची माहिती घेऊन जाणीवपूर्वक कामे प्रलंबित ठेवली असे आढळल्यास त्यांना नियम काय आहेत हे दाखवावे लागतील असा इशाराही यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. जिल्हा परिषद प्रशासनाकडून कृषी पशु पक्षी मेळाव्याचे चांगले आयोजन केले होते. याच धर्तीवर पुढील वर्षी सिंधु कृषी पर्यटन महोत्सव आयोजित केला जाईल. असे यावेळी उदय सामंत यांनी स्पष्ट केले २५ कोटी निधिवर पाणी सोडावे लागेल ओरोस नगरपंचायत मंजूरी बाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले शासनाकडून नवनगर प्राधिकरनाला २५ कोटी निधी मंजूर आहे. तो निधी अद्याप मिळालेला नाही.
ओरोस नगर पंचायतीला मंजूरी मिळाल्यास या २५ कोटी मंजूर निधिवर पाणी सोडवे लागेल त्यासाठी नगरपंचायत मजुरीला विलंब होत आहे. असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . जिल्हा परिषदेवर भगवा फडकऊ जिल्हा परिषद प्रशासनवर तत्कालीन पदाधिकारी वचक ठेऊ न शकल्याने विकास कामाचा ४३ कोटी निधी शासनाला परस्पर गेला .त्यासाठी आता प्रशासनावर वचक ठेवतील अश्या पदधिकाऱ्याची आवश्यकता आहे म्हणूनच जिल्हा परिषदे वर लवकरच भगवा फडकऊ असे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.