*कोकण Express*
*कृषी प्रदर्शनाच्या यशस्वी नियोजनाबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान*
*ना. उदय सामंत,आ. दीपक केसरकर,आ.वैभव नाईक यांच्या वतीने सन्मान पत्र प्रदान*
सिंधु कृषि औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व पर्यटन मेळाव्याचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल पालकमंत्री ना.उदय सामंत, माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आज सत्कार करण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कुडाळ पं.स. चे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
कुडाळ येथील सिंधु कृषि औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व पर्यटन मेळाव्याचा समारोप आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ना. उदय सामंत यांनी कृषी प्रदर्शनाच्या नियोजनाबाबत गौरवोद्गार काढले तसेच पुढील वर्षी देखील असेच भव्य दिव्य प्रदर्शन भरविण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत व इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.