आमदार हुस्नबानु खलिफे यांच्या आमदार निधीतून जिल्ह्यातील आरोग्य विभागाला ७ लाखाचे साहित्य

*कोकण Express*

*आमदार हुस्नबानु खलिफे यांच्या आमदार निधीतून जिल्ह्यातील आरोग्य विभागाला ७ लाखाचे साहित्य…..*

*जिल्ह्याच्या मदतीसाठी केव्हाही हाक मारा मी धावून येईन – हुस्नबानु खलिफे*

*कणकवली ः प्रतिनिधी संजना हळदिवे*

माजी आमदार हुस्नबानु खलिफे यांच्या आमदार निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय यांना कोरोना काळात आवश्यक भासणाऱ्या सॅनिटायझर, मास्क, पीपीई किट, थर्मल गन, फेस वायझर आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. शुक्रवारी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात खलीपे यांच्या उपस्थितीत या साहित्य वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी हुस्नबानू खलिफे यांनी मला जिल्ह्यातील कोणत्याही समस्येसाठी हाक मारा मी सदैव तुमच्यासोबत असेन असे सांगितले. तसेच काँग्रेस पक्ष वाढीसाठी ही माझे नेहमीच सहकार्य असेल अशी भूमिका खलीपे यांनी मांडली. या साहित्याचा उपयोग आरोग्य कर्मचारी व कोरोनाशी दोन हात करणार्‍या कर्मचार्‍यांना निश्चितपणे होईल असेही त्या म्हणाल्या.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हा परिषद सभापती नागेश मोर्ये, सरचिटणीस महिंद्र सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, प्रवीण वरूनकर, ईशाद शेख, विजय कदम, प्रदीप तळगावकर, डॉक्टर प्रमोद घाडीगावकर, साद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पोळ, आरोग्य कर्मचारी प्रशांत बुचडे, माजी आमदार हुस्नबानु खलिफे यांच्या आमदार निधी मधून जिल्ह्यातील आरोग्य विभागाला सात लाख रुपये आमदार निधी देण्यात आला होता.

या निधीमधून जिल्ह्यातील कोविड रुग्णांना उपचार देणारे डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांना आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यात आले. हे साहित्य संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. आठही तालुक्यांमध्ये हे साहित्य तालुकास्तरावर सुपुर्द करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली.

यावेळी बाळा गावडे यांनी कोविड काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी कसोशीने काम करत मेहनत घेतली त्याचे कौतुक केले. काँग्रेसला उभारी देण्याचे काम कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही जिल्ह्यात सुरू केले असल्याचे श्री गावडे यांनी सांगितले. तसेच कोरोना काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने अत्यंत कठीण काळात सेवा देत अनेक रुग्णांना कोरोना मुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावण्याचे श्री गावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!