*कोकण Express*
*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर भाजप पक्षांचा बहिष्कार*
*ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय*
*पालकमंत्र्यांची जिल्हा विकासाची खोटी आश्वासने ऐकायला जायचं काय ?*
*आ. नितेश राणेंचा पालकमंत्र्यांवर हल्लाबोल*
*ओरोस ः प्रतिनिधी*
आज होत असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर भाजप पक्ष बहिष्कार घालत आहे. ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय होत आहे. केवळ बनवा बनवी केली जात आहे. जिल्ह्याचा विकास ठप्प असताना आम्ही सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांची खोटी आश्वासने एकायला जायची काय ? बदाम आणि चहासाठी जायचे का ? असा प्रश्न करीत भाजप या जिल्हा नियोजन बैठकीवर बहिष्कार घालत आहे, असे भाजप आ नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले.