*कोकण Express*
*चिंचवली गुरववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
चिंचवली गुरववाडी येथे आमदार निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचा आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते आज शुभारंभ करण्यात आला. चिंचवली गुरववाडी येथील विहिरीकडे जाणारा रस्ता व्हावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत होती. खारेपाटण शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला होता. आज या कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, सरपंच रुंजी भालेकर, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम गुरव, सुरेश गुरव, रवींद्र गुरव यांसह गुरववाडीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.