*कोकण Express*
*शाळा नंबर 5 चा छप्पर दुरुस्ती प्रस्ताव दिरंगाईची ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे चौकशी लावणार*
*राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांनी दिला इशारा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा नं 5 चा गेली 5 वर्ष छप्पर दुरुस्ती प्रस्ताव मजूर न झाल्याने राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अबीद नाईक यांनी आज प्रत्यक्ष शाळेमध्ये पाहणी करून कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना यासंबंधी जाब विचारत धारेवर धरले. हा प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे चौकशी लावणार असा इशारा देखील राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अबीद नाईक यांनी यावेळी दिला.
कणकवली शहरातील शाळा नं पाच शाळेची छप्पर नादुरुस्त झाल्याने लवकरात लवकर हे छप्पर दुरुस्त करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अबीद नाईक यांनी सांगितले. जर शासनाकडून मदत मिळण्यास उशीर झाला तर आपण स्वखर्चाने ती डागडुजी करणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले यावेळी कणकवली बीडिओ अरुण चव्हाण,मुख्याध्यापक कल्पना मालये, शिक्षक नेते प्राथमिक शिक्षक समिती प्राथमिक शिक्षक समिती गिल्बर्ट फर्नांडिस ,अमित केतकर ,निशिकांत कडूलकर, विशाल ठाणेकर, उपस्थित होते