*कोकण Express*
*शहरातील मान्सूनपूर्व १९ ठिकाणची कामे लागली मार्गी…!*
*नगरसेवक सुशांत नाईक यांच्या घराकडील गटार ही न.पं.करणार साफ…!*
*न.पं.चे आरोग्य सभापती संजय कामतेकर यांचा टोला…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील नालेसफाई सुरू करून दहा दिवस उलटले. कणकवली शहरातील मान्सूनपूर्व कामांवर नगरपंचायत ने आराखडा तयार केला असून त्यानुसार नगरपंचायत कर्मचार्यांचे काम सुरू आहे. शहरातील 19 ठिकाणची कामे मार्गी लागली आहेत. व उर्वरित जवळपास 22 कामे येत्या दहा दिवसात पूर्ण होतील. मात्र एवढे होऊन सुद्धा नगरसेवक असलेल्या सुशांत नाईक यांना हे माहिती नाही हे दुर्दैवी आहे. तसेच शिवसेनेचे आरोप बोगस आहेत असा टोला आरोग्य सभापती गटनेते संजय कामतेकर यांनी लगावला. कणकवली शहरातील नालेसफाई प्रश्नी विरोधी नगरसेवकांसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अवधुत तावडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी विरोधी नगरसेवकांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना श्री कामतेकर यांनी गटार साफसफाई यादीच प्रसारमाध्यमांपर्यंत दिली. यामध्ये सना कॉम्प्लेस ते एसटी गॅरेज, आरोलकर घर ते सांडव घर हर्णे आळी गटार, तेली आळी ते उपरकर घर ते तेंडुलकर घरा पर्यत गटार, फातिमा चाळ ते दळवी वकील ते हॉटेल गोकुळधाम पर्यत गटार, पटकी देवी ते जुना नरडवे रोड गटार, डॉ. नाडर विष्णू आपारमेंट गटार, बौद्धवाडी ते सतीश कांबळे घर गटार, डेगवेकर मिल ते हॉर्नबिल हॉटेल गटार, नगरपंचायत रोड गटार, हर्णे आळी ते अबीद नाईक ते संजीवनी हॉस्पिटल गटार, सार्वजनिक शौचालय ते पराष्टेकर घरापर्यंत गटार, फौजदार वाडी आरोलकर फार्म हाऊस पर्यंतचे गटार, सह्याद्री हॉटेल मागील गटार, कामत सृष्टी ते जुना नरडवे रोड गटार, हॉर्नबिल ते मंजुनाथ हॉटेल ते छत्रालया पर्यत गटार, कॉलेज रोड गटार, शाळा नंबर 2 ते अमर पवार घर गटार, देगवेकर मिल ते भालचंद्र नगर गटार, प्रमोद वाळके ते सारस्वत बँक गटार, एकूण 19 ठिकाणची कामे नगरपंचायतीने पूर्ण केली आहेत. तर अजून 22 ठिकाणची कामे प्रगतीपथावर असून यामध्ये वीज वितरण ते सुशांत नाईक यांच्या घराच्या पाठीमागील गटार देखील कणकवली नगरपंचायत साफ करणार आहे अशी माहिती श्री कामतेकर यांनी दिली. या कामांमध्ये महापुरुष मंदिर बाजारपेठ गटार, तेली आळी गटार, मराठा मंडळ रोड गटार, बिजलीनगर गटार, एसटी वर्कशॉप गणपती मंदिर गटार, दत्तमंदिर ते पालव घर ते रेल्वे वसाहत पासून नाथ पै नगर पर्यंत गटार, बांधकर वाडी ते शिवशक्ती हॉल गटार, काजरेकर हॉल ते कुडतरकर घर गटार, साईनगर वरचीवडी गटार, भालचंद्र महाराज मठ रोड बेळेकर सर घर ते ढालकाठी पर्यत गटार, टकले हॉटेल ते सुकी बिल्डिंग गटार, मारुती मंदिर ते टेंबवाडी गार्डन ते मुसळे घर गटार, गणपती साना रोड गटार, भुमिअभिलेख दळवी वकील घरा पर्यत गटार, नागवे रोड स्वयंभू मंदिर गटार, परबवाडी ते शिवाजीनगर पर्यंतचे गटार, शिवाजीनगर ते उमेश वाळके घरा पर्यत गटार, परबवाडी टॉवर ते रेल्वे स्टेशन ते गटार, हॉटेल mh 07 ते उचले बिल्डींग गटार,नाथ पै नगर मधील नाला, व कीनई ते चर्च पर्यंत हायवे चे गटार ही देखील कामे येथील येत्या 10 ते 12 दिवसात पूर्ण करून कणकवली नगरपंचायत मान्सून व नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज असणार आहे अशी माहिती श्री कामतेकर यांनी दिली. त्यामुळे नगरपंचायत वर आरोप करणाऱ्यांनी अगोदर कामांची माहिती घ्यावी असा टोला देखील श्री कामतेकर यांनी लगावला.