*कोकण Express*
*नाँनबँकींग फायनान्स कंपनीचा महाघोटाळा सोशल मिडीयावर बाहेर काढल्याने,अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मानकूटी उडवून देऊन घरात घूसून जिवे मारण्याची दिली धमकी?*
*सोशल मिडीयावर धमकीची ओडीओ क्लीप स्वतः या तालुकाध्यक्षानीचं व्हायरल करुन कायदा हातीत घेऊन सामाजिक शांतता भंग करीत असताना पोलीस यंत्रणा गप्प का?*
*सावंतवाडीतील तालूकाध्यक्षांचा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाने केला जाहीर निषेध..*
*सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)*
जिल्ह्यात नाँनबँकींग फायनान्स कंपनीचे जाळे पसरवून येथील ठेवीदारांशी होणारी फसवणूक करणाऱ्या नाँनबँकींग क्षेत्रातील टोळीचा बुरखा सोशल मिडीयावरुन चिरफाडरचे संपादक सुनील पेडणेकर यांनी टराटरा फाटल्याने या नाँनबँकींग फायनान्स घोटाळ्यात अडकलेल्या आपल्या गुरु नामक मित्राला वाचविण्यासाठी या तालुकाध्यक्षानी अतिशय खालच्या पातळीवर येऊन अतिशय निंदनीय भाषेत सुनील पेडणेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलेल्या प्रतिष्ठीत व्यक्तीला शिवीगाळ करीत भर बाजारात मानगूटी कापून टाकून घरात घूसून जीवे मारण्याची जी धमकी दिली आणि त्याची ओडीवो क्लीप स्वंतःच सोशल मिडीयावर फीरवून आपल्या दहशतीसमोर कुणीही बोलणार नाही.तसेच कायदा आपल काहीच बिघडवू शकत नाही.अशा आवेशात पक्षदेखील आपल्या दहशतीसमोर नतमस्तक आहे.अशीच धारणा असलेल्या या महाविकास आघाडीतील एका तालूकाध्यक्षानी चिरफाड संपादकांना अपमानीत करुन ज्या भाषेत धमकी दिली त्याचा सर्व समाजमाध्यंमानी निषेध केला पाहीजे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने सुनील पेडणेकर यांना जाहीर पाठींबा दिला असून अशा भ्याड प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला आहे.
समाज माध्यमांसमोर सत्य मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या पत्रकारीतेतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या हीन पातळीवर येऊन धमकी दिलेली ओडीवो क्लीप पोलीस यंत्रणेला उघड आव्हान देत हा तालूकाध्यक्ष सोशल मिडीयावर फीरवत असतील तर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कोणत्या कायदा आणि सुव्यवस्थेची कार्यतत्परता पार पाडणार आहे.अशी चर्चा सुरू आहे.