*कोकण Express*
*केसरकर आता पत्रक छापून हे रस्ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून केल्याचा दावा करुन फुक्याचे श्रेय घेत आहे..*
*माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शहरातील विकास कामामध्ये आमदार दिपक केसरकर कुठे खो घालण्याचे काम करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान बाहेरच्यावाड्यतील रस्ते हे केंद्रीय मंत्री नारायण यांच्या नगरोथ्यानच्या माध्यमातून आमच्या कारकीर्दीत मंजूर झाले आहेत. त्यामुळे केसरकर आता पत्रक छापून हे रस्ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून केल्याचा दावा करत आहे. आमदार केसरकर हे आता फुक्याचे श्रेय घेत असल्याचा आरोप देखील संजू परब यांनी आज येथे केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक नासीर शेख,दिपाली उत्कर्षा सरकर आनंद नेवगी,राजू बेगअजय सावंत,बंटी पुरोहित,बंटी जामदार,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.