*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कोर्ले ते खारेपाटण नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ*
*पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा त्रास वाचणार*
देवगड तालुक्यातील कोर्ले गावात पावसाळ्यात नदीच्या पाण्यामुळे घरात पाणी घुसून होणारे नुकसान तसेच शेतीला होणारे नुकसान लक्षात घेत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कोर्ले ते खारेपाटण नदीचा गाळ उपसण्याचे काम सुरू करण्यात आले. आमदार नातेश राणे यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोर्ले सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते