*कोकण Express*
*तोंडवली काॅलेजमध्ये कॅम्पस मुलाखतीचे आयोजन*
*कासार्डे:संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज तोंडवली येथे दिनांक १८, १९ व २२ मे २०२२ रोजी मेडिकल कोडींग, फार्मास्युटिकल मार्केटिंग व प्रोडक्शन ऑफीसर यांसारख्या पदांसाठी कॅम्पस मुलाखतीचे (रिक्रूटमेंट ड्राइव्ह) आयोजन करण्यात आले आहे.
थेट महाविद्यालयातूनच नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बी.फार्मसी उत्तीर्ण झालेले आणि सध्या बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी प्रा.अखिल काणेकर ,प्रा.विलास मुढे(ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग) यांच्याशी संपर्क साधावा. इच्छूक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य तुकाराम केदार यांनी केले आहे.