*कोकण Express*
*भाजपा – शिवसेनेची सोसायटी निवडणुकीत पदासाठी युती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्यात शिवसेना भाजपचे टोकाचे वाद असताना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मध्ये चक्क एका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची तडजोड झाली. व त्यात निवडणूक घेण्याऐवजी शिवसेनेला काही जागा तर भाजपला काही जागा व शिवसेनेला एक पद व भाजपला एक पद असे वाटप देखील करण्यात आले. आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. जरी ही निवडणूक पक्ष चिन्हावर नसली तरी प्रत्यक्षात निवडणुकीतील संबंधित कार्यकर्ते हे मात्र राजकीय संबंधित असल्याने या अनोख्या तडजोडीची चर्चा मात्र जिल्ह्यात सुरु आहे. कणकवली तालुक्यातील साकेडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी या निवडणुकीत शिवसेना प्रणित व भाजप प्रणित पॅनलने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक न करता संस्थेच्या हिताकरिता बिनविरोध संचालक निवड करण्याचा निर्णय घेतला. व तशा आपापसात निवडी देखील झाल्या. यात झालेल्या तडजोडीत एकूण १३ पैकी शिवसेना प्रणित पॅनल ला ५ जागा व व्हाईस चेअरमन पद देण्याचा निर्णय झाला. तर भाजप प्रणित पॅनलला ७ जागा सोडण्यात आल्या. आणि चेअरमन पद देण्याचा निर्णय झाला. तर एक जागा त्या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने रिक्त राहिली. व अखेर या निवडणुकीत शिवसेना – भाजपचा समझोता झाला. त्यानंतर मंगळवारी चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडी देखील झाल्या. यामध्ये चेअरमन पदी भाजप प्रणित पॅनलचे कणकवलीचे माजी सभापती संजय शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी शिवसेनाप्रणीत पॅनलचे बबन राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी प्रसंगी नवनिर्वाचित संचालक बंडू साटम, कृष्णा सदवडेकर, सुवर्णा सावंत, सत्यवान मुणगेकर, इक्बाल शेख, अकबर शेख, स्नेहा लाड, ग्रामस्थ रमाकांत सापळे, गट सचिव श्री. डगरे, आदी उपस्थित होते निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री खांडेकर यांनी काम पाहिले.