*कोकण Express*
*युवासेनेच्या कणकवली, वैभववाडी, देवगड पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठक संपन्न..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
युवासेनाप्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश श्याम कदम, विस्तारक अमित पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितित युवासेना कणकवली, वैभववाडी व देवगड पदाधिकारी आढावा बैठक 1,2,3 या तारखेला पार पडली. पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी घेतलेल्या या बैठकीस युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश श्याम कदम व अमित पेडणेकर यांनी -:
1) युवासेना कणकवली विधानसभा व्हॅाट्सअप क्रमांक (9325155395) चे लोकार्पण
2) बुथ तिथे युथ (Youth)
3) विद्यार्थींचे प्रश्न सोडवण्यासाठी कणकवली कॅालेज, वैभववाडी कॉलेज व वैभववाडी कॉलेजमध्ये युवासेना युनिटची स्थापना
4) नविन मतदार नोंदणी
5) शिवसेना सभासद नोंदणी
6) स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे
7) युवासेनेची गाव तिथे शाखा
8) महाराष्ट्र शासनाच्या योजना स्थानिक लोकांपर्यंत पोहचविणे.
या सर्व प्रमुख मुद्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख गितेश कडू यांनी युवासेना पदाधिकारी व युवा सैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी विस्तारक राजू राठोड, जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी, कणकवली तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, युवासेना तालुका चिटणीस सचिन पवार, गुरुनाथ पेडणेकर, तालुका संपर्क प्रमुख, शहर अधिकारी तेजस राणे, सिध्देश राणे, सुशांत मोहिते, रोहीत राणे, उमेश गुरव, संतोष सावंत, नासीर खान, प्रकाश वाघेरकर, किरण वर्धम, प्रथमेश वरूणकर, प्रतीक रासम, कैलास घाडीगावकर, वैभव मालंडकर, सुर्यकांत घाडीगावकर, तेजस राऊत (बंटी), प्रकाश वाघेरकर, प्रतीक रासम, प्रफुल तोरस्कर, पदाधिकारी व युवासैनिक, शिवसैनिक उपस्थित होते.