*कोकण Express*
*निलेश राणे यांनी सर्जेकोट येथे जेटी जोड रस्ता कामाची केली पाहणी*
सोमवारी निलेश राणे यांनी सर्जेकोट येथे जेटी जोड रस्ता कामाची पाहणी केली. वस्तुस्थिती जाणून घेतली. याबाबत ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. आम्ही ग्रामस्थांसोबत असल्याचा विश्वास निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला.यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सर्जेकोट ग्रामस्थ आदी उपस्थित होते.