*कोकण Express*
*भारतीय जनता पक्षाच्या वतीने भिरवंडे ,खलांतर (गांधीनगर)येथील शेतकऱ्यांना मोफत दोन कीलो भात बियाण्यांचे वाटप*
*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश(गोट्या)सावंत यांच्या हस्ते झाले वाटप*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
भारतीय जनता पक्षाच्या वतीने भिरवंडे ,खलांतर (गांधीनगर)येथील शेतकऱ्यांना मोफत दोन कीलो भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश(गोट्या)सावंत यांच्या उपस्थितीत रमेश सावंत,विजय सावंत,व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.१२५ शेतकऱ्यांना घरपोच भात बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे संदेश सावंत यांनी सांगितले.आज या भात बियाण्यांचे प्रथम सत्रात दहा शेतकऱ्यांना वाटप करून शुभारंभ करण्यात आला. काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल त्या मुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे वाटप करण्यात आले आहे.ऐनवेळी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला तर शेतकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.म्हणून आज रोजी बियाण्यांचे वाटप करण्यात आले.याही पुढे शेतकऱ्यांना वेळोवेळी सहकार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी अनाजी सावंत,श्रीकांत सावंत,संतोष सावंत,अनंत सावंत,बाळा सावंत,मधुकर सावंत,गावकर गुरुजी, सतीश नाटळकर ,आबा सावंत,मोतीराम सावंत,उपस्थित होते.