कोकण विकास पर्यटनाचा रोडमॅप बनवणार-संदेश पारकर

कोकण विकास पर्यटनाचा रोडमॅप बनवणार-संदेश पारकर

*कोकण Express*

*कोकण विकास पर्यटनाचा रोडमॅप बनवणार-संदेश पारकर*

*पर्यटनाला चालना देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न करणार*

*कणकवलीत शिवसेनेकडून संदेश पारकर यांचे  अभिनंदन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोकण पर्यटन विकास समिती कोकण विभाग उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,खा.विनायक राऊत, माजी मंत्री दीपक केसरकर, आ.वैभव नाईक, सतीश सावंत,संजय पडते,अतुल रावराणे व सर्व नेते यांचे आभार मानतो.या विभागाचा आढावा घेऊन कोकण विकास पर्यटनाचा रोडमॅप बनवणार असल्याची माहिती नूतन उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

कोकण पर्यटन समिती उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय येथे सत्कार प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आगे बढो,हम तुम्हारे साथ है..! आदित्य ठाकरे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..!, संदेश भाई तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..! अशा जोरदार घोषणा देत जल्लोष केला. यावेळी शिवसैनिकांनी फटाके वाजवत घोषणाबाजी केली.

यावेळी जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी संदेश पारकर यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनीही सत्कार केला.यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,तालुकाप्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,सचिन सावंत,शहराध्यक्ष शेखर राणे,संजय पारकर,सुनील पारकर,निसार शेख,हर्षद गावडे,राजू राठोड,बाबू घाडीगांवकर, आनंद मर्ये,सुशिल दळवी,मंगेश सावंत,महेंद्र डिचोलकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संदेश पारकर म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे.कोकणातील सर्व पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.शासनाच्या माध्यमातून पर्यटन विकास करण्यात येईल.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणला पुन्हा ताकद देण्यासाठी ही मला संधी दिली आहे.या संधीचे सोने केलं जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!