*कोकण Express*
*राज ठाकरेंची सभा पुण्यात होणार, परवानगीही मिळाली*
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. औरंगाबाद, ठाण्यानंतर आता पुण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुण्यातील राज ठाकरे यांच्या सभेची जागा ठरली. डेक्कन नदी पात्रात होणार सभा होणार आहे. आजपासून राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पक्षांतर्गत वाद मिटणार का याकडे लक्ष, लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुण्यातील मनसे अंतर्गत वाद तसेच पुण्यात मनसेची सभा या पार्श्वभूमीवर महत्वाचा पुणे दौरा असणार आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेसाठी जागा फायनल झाली आहे. डेक्कन नदी पत्रात आता सभा होणार आहे. आधी एफसी कॉलेज मैदानावर सभा होण्याची शक्यता होती.
मात्र, जागेत बदल करण्यात आला आहे. मनसेने डेक्कन पोलिसांना पत्र दिले आहे. 15 मे रोजी राज यांच्या सभेबाबत हे पत्र दिले होते. काल येथील जागेची पाहणी करण्यात आली. आता परवानगी मिळाल्याने नदी पत्रात राज ठाकरे यांची सभा होणार आहे.