*कोकण Express*
*बांदा ‘ते’नेमळे पर्यंत रस्त्याच्या बाजूला अनधिकृत माती उत्खनन करून भराव टाकल्याने पुन्हा पुर येण्याची शक्यता…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
बांदा ते नेमळे हायवे पर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला अनधिकृत माती उत्खनन करून भराव टाकण्यात आलेला आहे. या माती उत्खननमुळे पूर्वीचे जे पाण्याचे प्रवाह मार्ग होते ते बुजवण्यात आले आहेत त्यामुळे भविष्यात पुन्हा या ठिकाणी पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व प्रकाराला तलाठी मंडळ अधिकार सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.