*कोकण Express*
*मुंबईची पावसाळ्यात तुंबई होणार नाही यासाठी काय खबरदारी घेतली…*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
‘पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते’ अशी प्रसारमाध्यमात मुंबईची ओळख आहे . यात तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत . तरीही सत्ताधारी असलेली शिवसेना काहीही करू शकलेली नाही . यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे जनतेच्या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे असे पत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे .
मुंबईत ३८६ तुंबणारी धोक्याची ठिकाणे आहेत. आणि यावर्षी २२ दिवस भरतीही आहे . त्यामुळे २५० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यास २६ जुलै च्या परिस्थितीची आठवण येईल. अशी भीती सर्वत्र आहे .
या परिस्थितीत पाण्याचा उपसा करण्यासाठी कोणत्या योजना केल्या आहेत का ? राज्य सरकार व पालिका प्रशासन यावर धोरणे आखणार आहे का ? व संभाव्य परिस्थितीत करायच्या उपाययोजनांबद्दल जनजागृती केली आहे का ? असे प्रश्न नितेश राणे यांनी पत्राद्वारे उपस्थित केले आहेत.