*कोकण Express*
*आ. नितेश राणे यांच्याहस्ते फोंडाघाट सोसायटीतर्फे भात खरेदी शुभारंभ*
*फोंडाघाट प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील फोडाघाट येथे फोडाघाट सोसायटीतर्फे भात खरेदी शुभारंभ श्रीफळ वाढवून माननीय आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सोसायटी चेअरमन व भाजप तालुका मंडळ अध्यक्ष श्री.राजन चिके,पंचायत समिती सदस्य माजी सभापती सौ.सुजाता हळदिवे,पंचायत समिती सदस्य श्री.मनोज रावराणे,माजी सभापती मामा हळदिवे,सरपंच संतोष आंग्रे,उपसरपंच,माजी सरपंच प्रकाश भालेकर, उद्योजक सुरेश सामंत, ग्राम पंचायत सदस्य व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.