*कोकण Express*
*अखेर कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अधिवेशनाचा नारळ फुटला*
*कासार्डे:संजय भोसले*
कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सभा कार्याध्यक्ष रविंद्र पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील अल्पबचत सभागृहात नुकतीच पार पडली. सदर सभेमध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अधिवेशन हे कोल्हापूर जिल्ह्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले . कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री गौतम वर्धन यांनी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आपल्या शिक्षक संघटनेचे अधिवेशन व्हावे अशी विनंती केली .त्यामुळे हे अधिवेशन कोल्हापूर मध्ये घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. मागील दोन वर्षाच्या कोविड -१९ च्या परिस्थितीमुळे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अधिवेशन स्थगित करण्यात आले होते. परंतु आता ही परिस्थिती सामान्य झाल्यामुळे शिक्षक अधिवेशन कोल्हापूरमध्ये सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले .
आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री.आकाश तांबे यांनी शिक्षक संघटनेने मागील दोन वर्षांमध्ये कोविडच्या काळामध्ये राज्यभर आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. आरोग्य केंद्रांमध्ये , covid सेंटरमध्ये आणि चेक पोस्ट वर शिक्षकांनी ड्युटी केलेल्या आहेत त्यांचेही कौतुक करण्यात आलं. त्याचबरोबर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उदा. रायगड ,रत्नागिरीतील चिपळूण या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली होती .त्याठिकाणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून कडून मदत कार्य करण्यात आले होते त्या सर्व कार्यकर्त्यांचा कौतुक करण्यात आले. कास्ट्राईब शिक्षक संघटना सामाजिक, शैक्षणिक कार्यामध्ये सातत्यानं प्रगती करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
अमरावती शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल श्री शशिकांत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक आकाश तांबे यांनी तर आभार उपाध्यक्ष विजय जाधव यांनी मानले.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला नागसेन धनवे (उपाध्यक्ष) बीड, विजय जाधव ( उपाध्यक्ष)ठाणे, बी डी धुरंधर (मुख्य संघटन सचिव) बुलढाणा, प्रभाकर पारवे ( अतिरिक्त सरचिटणीस) नाशिक, राजेंद्र जाधव (अतिरिक्त सरचिटणीस)पुणे , प्रदीप वाघोदे (कोषाध्यक्ष )रत्नागिरी, बि.डी. धुरंधर ( मुख्य संघटन सचिव) बुलढाणा, विशाल सुरवसे ( संघटन सचिव)पुणे , प्रशांत मोरे-सातारा, सतीश कांबळे-परभणी , बाजीराव प्रज्ञावंत -सांगली ,राजेंद्र वाघमारे- यवतमाळ ,संतोष गाडे- ठाणे, महेश अहिरे- नाशिक ( सर्व विभागीय अध्यक्ष ) , तुषार आत्राम -यवतमाळ,गौतम वर्धन, संजय कुर्डूकर, अरुण सावंग, पी.डी सरदेसाई- कोल्हापूर (सदस्य). श्री राजकुमार घोडेस्वर गडचिरोली, श्रीसेल कोरे, सोमलिंग कोई, पवन कांबळे – सोलापूर ,अशोक गायकवाड- कल्याण , शशिकांत गायकवाड ,राजकुमार वानखेडे- अकोला, सचिन पारधे पुणे .