*कोकण Express*
*पालयेकर यांच्या निधनामुळे एका चांगल्या कार्यकर्त्याला मुकलो…*
*राजन तेली; जिल्हा भाजपचेही नुकसान, कधीही न भरून येणारे…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भाजपाचे प्रभारी तालुकाध्यक्ष तथा आंबोली सरपंच गजानन पालयेकर यांच्या आकस्मित निधनामुळे आम्ही एका चांगल्या कार्यकर्त्याला मुकलो, माझ्या कुटुंबातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. त्यांच्या जाण्याने जिल्हा भाजपचे झालेले नुकसान कधीही न भरून येणारे आहे, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
श्री. पालयेकर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तेली यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, श्री.पालयेकर हे गेले अनेक दिवस पक्षाचे प्रामाणिकपणे काम कर होते. त्यांच्याकडे प्रभारी तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी नुकतीच देण्यात आली होती. या काळात त्यांनी चांगले काम केले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणे , अशी वेगळी खुबी त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांच्या अचानक निधनामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.