*कोकण Express*
*केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी!*
अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. शनिवारी केतकीला अटक करण्यात आली. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे केतकीला शरद पवारांविरोधात पोस्ट करणं महागात पडलं आहे.
ठाणे कोर्टाचे न्यायाधीश वी. वी. राव -जडेजा यांच्यासमोर केतकी केसची सुनावणी झाली. केतकी चितळे हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी केतकी हिने केलेल्या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याचे सांगितले.