*कोकण Express*
*आ.नितेश राणे यांनी केली पडवणे अग्निकांडाची पाहणी*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड तालुक्यातील पडवणे डोंगरावर हजारो एकर परिसर आग लागून बेचिराख झाला आहे. सुमारे 400 कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तर काही शेत मांगरही जळून गेले आहेत. या नुकसानीची पाहणी आमदार नितेश राणे यांनी आज केली. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी पण योग्य पंचनामे करा असे आदेश त्यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला दिले आहेत.
देवगड तहसीलदार यांच्याशी फोनवरून चर्चा केली व स्थानिक तलाठी यांना घटनास्थळी बोलवून त्यांना योग्य त्या सूचना केल्या,सोबत देवगड पंचायत समिती उपसभापती श्री.अमोल तेली व भाजप पदाधिकारी श्री.बाळा खडपे,प्रकाश राणे,रवी पाळेकर होते.